◼️ काव्यरंग :- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
************************

क्रांतीसुर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
14 एप्रिल ला जन्मलेले छान
दलितांचे कैवारी ते श्रेष्ठ
संविधान दिले भारत देशाला महान

स्पृश्य-अस्पृश्य भेद भावातून
उच्च शिक्षण घेतले फार
हक्क कर्तव्याची जाणीव करून दिली
धर्मनिरपेक्ष लोकशाहीचा प्रसार केला अपार

नागपूर भूमीमध्ये दीक्षा घेतली
बौद्ध धर्माची प्रचिती दिली गवाऀत
कायदेपंडित बनून भारताची
राज्यघटना दिली देशाला स्वातंत्र्य पर्वात

देशाचा राज्य कारभार चालतो
भारतीय संविधानाची ख्याती
अस्पृश्यता दूर केली त्यांनी
दूरदृष्टीतेची पसरवली ज्योती

आर्थिक व राजनैतिक न्याय
अस्पृश्यताना मिळवून दिले खास
समता, बंधुता, स्वातंत्र्य, स्त्री हक्क
राज्यघटनेचे शिल्पकाराचा आहे अधिवास

सागराचे पाणी कधी
आटणार नाही भिम राया
भारतीय संविधान दिले देशाला
तुझे कार्य जाणार नाही वाया..

◼️✍️ सौ.भारती दिनेश तिडके
रामनगर सिंगल टोली वार्ड,
मुन्सिपल शाळेजवळ गोंदिया. पिनकोड:-441614
मोबाईल नंबर:-8007664039, 7020756845.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *