◼️ काव्यरंग :- गझल – भानावर येवूनीया

गझल – भानावर येवूनीया

भानावर येवूनया बेभान आज झाले
माळलेल्या फुलांना विखरुनी आज गेले.!१!

आहे अशांत मन हे अशांत भावनाही
उसळलेल्या लाटावरी पोहूनी आज गेले.!२!

काय दोष माझा मी तर खरे प्रेम केले.
प्रेमाचा डंख त्याचा पचवूनी आज गेले.!३!

स्वप्ने गुलाबी माझी घरटे मी बांधलेले.
स्वप्नास माझीया मी उधळूनी आज गेले.!४!

उध्वस्त जीवनाची माझी मी साक्षीदार.
माझ्याच प्रारब्धावर हसूनी आज गेले.!५!

खोट्या त्या आणाभाका खोटी वचन ठरली.
जपलेल्या नात्यास उसवूनी आज गेले.!६!

◼️प्राजक्ता आर. खांडेकर
सुगत नगर नागपूर.
सदस्या मराठीचे शिलेदार समूह.
निर्माती/लेखिका/कवयित्री/गीतकार/निवेदिका
कस्तुरी फिल्म एंटरटेन्मेंट वर्ल्ड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *