◼️ काव्यरंग :- सुख पेरीत जावे


सुख पेरीत जावे


सुख पेरीत जावे
जीवन आशावादी करण्या
दुःखही झेलून घ्यावे
हसत खेळत जगण्या

दुःखाचे डोंगर
कोसळले जरी तनी
संघर्षा वर मात
करावा जीवनी मनी

सर्वांशी मिळून मिसळून वागावे
व्यवहार करावा माणुसकीचा
नातीगोती जपावी छान
हास्य फुलवावे आपुलकीचा

सुख पेरीत जावे
संस्काराची शिदोरी छान
संवेदना जुळते एकमेकांशी
मायेची ऊब मिळते महान

दुःखाला विसरून
गोड हास्य असावे खास
सुख पेरीत जावे
आनंद शांती चा राहे अधिवास

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *