भेदोळ्यात शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

भेदोळ्यात शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

◼️राजुरा तालुक्यातील प्रत्येक गावात लोककल्याण आरोग्य समिती मुंबई तर्फे होऊ घातलेल्या आरोग्य शिबिरासंबंधी झाली चर्चा


राजुरा : शिवसेना पक्ष्याच्या वतीने डिसेंबर मध्ये संपूर्ण राजुरा तालुक्यात शिवसेना राजुरा आणि लोककल्याण आरोग्य समिती मुंबई तर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

पक्ष प्रमुख मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रात या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा प्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात राजुरा तालुक्यातील संपूर्ण गावात हे शिबीर घेण्यात येत आहे.

त्याच पार्श्वभूमीवर माजी उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे, नगरसेवक राजू डोहे, शिवसैनिक निलेश गंपावार यांच्या नेतृत्वात संपूर्ण तालुका दौरा चालू आहे.
काल भेंडोळा येथे त्यासंबंधीची चर्चा केली आणि शिवसेनेच्या कार्यप्रणालीला प्रेरित होऊन भेंडोळा येथील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यामध्ये गावातील विविध पक्षातील कार्यकर्ते संघर्ष दुर्गे, करन ठाकरे, बंटी येरगुडे, राजकुमार देबटवार, शिवा रत्ने, शिलचंद्र दहागावकर, अतुल लोखंडे, साई तुलावार, अमृत बोबडे, राजेंद्र देबटवार, निर्दोष दुर्गे, विशाल आत्राम, अविनाश मून, इंद्रजित थेटे, रवी पिंपळकर, प्रफुल आत्राम, प्रवीण बावणे उमेश ठाकरे, सिद्धार्थ आईलवार, सुरज राऊतवार, प्रमोद दुर्गे, महेश कोंडवार, प्रकाश कोडापे, सीमीर बर्डे यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
याप्रसंगी शिवसेनेचे कार्यकर्ते गनेश चोथले,मनोज कुरवतकर, मिथुन नुलावार तसेच गावातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *