◼️ काव्यरंग :- आलो तुझ्या दारी देवा

आलो तुझ्या दारी देवा

आलो तुझ्या दारी देवा
तूच आहे भगवंता
संकटातूनी तारूनी घेतो
तूच आमचा कृपावंता

तुझीच भजने आरती
रोज गाते मी देवा
सर्वांना सुखी ठेव
कुणाचा करत नाही हेवा

सुखदुःखातून तूच
सावरून घेतो छान
विसरले नाही देवा तुला
आशीर्वाद देतो तू महान

भक्तिमय वातावरण
विश्वासाचा तूच धागा
मार्ग दाखवितो भक्तांना
विचारांचा नाही त्रागा

निर्गुन निर्विकार
इश्वरा तूच देतो मेवा
भक्तीत तल्लीन होते नेहमी
आली तुझ्या दारी देवा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *