मुकी फुले
बागेमधली ती फुल देखील
आता अचानक मुकी झालीत
तुझी माझी भेट होत नाही
म्हणून जराशी दुःखी झालीत
आपण जेव्हा रोज रोज भेटायचो तेव्हा कसं त्यांच्या ओठी हसू होतं
त्यांच्या सारखंच आपल ही नात
रोज नव्याने उमलत होतं
प्रेम म्हणजे काय असतं?
हे त्या फुलांनाही कळत होतं
फुलांवरच्या फुलपाखरासारखं
हे मन सुद्धा पळत होतो
दाखवून देऊ चल साऱ्यांना
या प्रेमाचा खरा अर्थ
दाखवू किंमत प्रेमाची
अन् प्रेमाचं सामर्थ्य