◼️ ललित लेख :- प्रेमाची परिभाषा

💕 प्रेमाची परिभाषा

प्रेमाचं रहस्य
आज जाणुन घेऊ.
लाखमोलाचं संदेश
या जगाला देऊ.

प्रेम हा अडिच अक्षरी सहज सोपा शब्द प्रत्येकालाच ठाऊक आहे. पण, प्रत्येकाच्या ओठात शोभेल असं नाही!… प्रेम हा शब्द ओठातुन निघताच मनामध्ये विविध प्रकारचे भावना आणि संवेदनांचे फुले उमलतात. ह्रदय मंदिरात प्रितिच्या टाळ – मृदंगाचा घंटानाद होतो. ओठातुन प्रितिचे सप्तसुर घुमघुमु लागतात. आणि खरं म्हणजे? नवयौवन गुलमोहरा सारखं बहरायला लागतो. प्रेमाच्या दिव्यशक्तिनेच निसर्गसृष्टी ताजीतवानी प्रफुल्लित होवुन जाते. प्रेम हि अशी एक बाग आहे कि, त्या बागेचा सुगंध विश्वाच्या चराचरात दरवळत असतो. प्रेम या पवित्र शब्दातच सारी सृष्टी सामावली आहे.
प्रेमाच्या मंदिरातच परब्रम्ह निरंतर वास करित असतो. जो
नेहमी प्रेम या शब्दाची आराधना करत असतो, त्यालाच साक्षार्थ ईश्वराचे दर्शन घडत असतात. खरं तर प्रेम म्हणजेच ? परमेश्वर आहे. पण, त्या प्रेमातुनच परमेश्वराला शोधता आलं पाहिजे!… प्रेम म्हणजे? दया, क्षमा, शांती जणु काही ब्रम्हा, विष्णु, महेशच… या तिंन्ही त्रिदेवाचे स्थान प्रेमातच आहे. प्रेम म्हणजे? संजिवनीरुपी अमृत… प्रेम म्हणजे? जिवन!

प्रेम म्हणजे?
सुमधुर वाणी…
समजणाऱ्याला अमृत
न समजणाऱ्याला पाणी…

प्रेम या विषया बद्दल कितीही लिहलं तरी,ते कमीच… कवी कल्पनेच्या पलिकडचं असणारा हा विषय न उलगडणारं कोडं आहे. प्रेम या विषया बद्दल कित्येक लेखक कविंनी भरभरून लिहिले आहे. पण, आजवर कुणालाच आपले नेमके मत व्यक्त करता आलले नाही!…प्रत्येकाच्या विचार प्रणाली नुसार प्रेमाची व्याख्या वेगवेगळी असते. प्रेम हा शब्द जरी, ऐक असला तरी, त्याचे स्वरुप मात्र अनेक आहेत. प्रेम या बंधनात्मक शब्दाने आपलं स्थान प्रत्येक नात्यात काबिज केलं आहे.त्याचं अस्तित्व काळणकाळ राहिल, यात शंका नाही!… प्रेमाचे असंख्य रुप आपणाला या विश्वाच्या चराचचरात पहायला मिळतील. जसे किंः आई-बाळाचे वात्सल्य प्रेम, पती-पत्निचे रोमांचक प्रेम, प्रियकर प्रेयसीचे नैसर्गिक तारूण्य सुलभ प्रेम, इतकेच नव्हेः तर, एखाद्या शत्रुचे सुध्दा मनात दडलेले अव्यक्त प्रेम:…अशा कितीतरी स्वरुपात प्रेमाचं अस्तित्व टिकुण आहे.
प्रेम नाजुक, कोमल, टवटवीत फुलासारखं असते. निरंतर वाहणाऱ्या पवित्र गंगेसारखं स्वच्छ, सुंदर असते. प्रेम कधिच कुणावर अधिकार गाजवत नाही! प्रेम कुणावर जबरदस्ती करत नाही! प्रेम आपलं हक्क सांगत नाही! प्रेम तर, समर्पित भावना असते. प्रेम देने असते, घेणे तर मुळिच नाही! प्रेमात माणसाचे आयुष्य उजळुन निघते. अख्खं जिवनच प्रकाशमान होवुन जाते. असा हा प्रेम आपल्या ठिकाणी एखाद्या रोपट्यासारंख तटस्थ उभा आहे. पण, आपले पाऊल मात्र भटकत चालले आहेत. आपण ज्या व्यक्तिवर प्रेम करतो, त्यानेही आपल्यावर प्रेम करावं असं थोडिच आहे. या इंटरनेटच्या जगात प्रेमाचं स्थान धोक्यात आलं आहे. अश्लिलतेचा बाजार मांडुन शरिरं क्षणिक सुखासाठी विकल्या जात आहेत. प्रत्येक तरुण- तरुणिच्या मनामध्ये अश्लिलता घर करून बसली आहे. आणि हिच अश्लिलता तरुणाईचं आयुष्य उध्वस्त करित आहे. मनामध्ये असणारी सेक्साँलाजिकल भावना आपल्या अस्तित्वाला,चारित्र्याला पोखरत चालली आहे. प्रेम या पवित्र शब्दाला क्षणिक वासनेचं स्वरुप देऊन, त्या शब्दाची विटंबना करण्यात येत आहे. पण, प्रेम म्हणजे? सेक्स नव्हेःतर प्रेम म्हणजे जिवन आहे. प्रेम या शब्दात वासनेला कुठंही स्थान नसते. सेक्स फक्त मणुष्यच करत नाही! तर, प्राणिमात्रा,जिवजंतु सुध्दा करतात. पण, खरं निस्सीम, निस्वाथँ,पवित्र,प्रेम करोडोतुन एखादाच करतो.
सेक्स हि नुसती क्षणिक सुखाची काम वासना आहे. यात कुठेही प्रेमाचं लवलेश आढळुन येत नाही! हे तरुण पिढीने, या माणव जतिने लक्षात घेतले पाहिजे!… एखाद्या देहविक्री करणार्‍या स्त्रिचं शरिर आपणाला सहज मिळू शकतो, पण तिच्या मनातलं निःस्वार्थ प्रेम नाही! कारण- प्रेम बाजारात मिळत नसते, आणि जर का मिळाले असते तर ते भाजिपाल्यापेक्षाही स्वस्त असते.
एक मात्र लक्षात ठेवा: उपभोगण्यास शरिरं मिळतात. पण एखाद्याचं निःस्वार्थ प्रेम नाही! प्रेमाला मोल नसते, ते हिरे- मोत्यांपेक्षाही अनमोल असते. प्रेम कुणाकडुन मागल्या जात नाही! तर ते शेवटी नशिबात असावं लागते. हा सगळा खेळ आपल्या कर्माचा अन् भाग्याचा असतो. भाग्यात ति असने हे लाखमोलाचं असतो. म्हणुनच साने गुरुजी म्हणतात: खरा तो एकची धर्म… जगाला प्रेम अर्पावे!
शेवटी इतकंच:

जिवणातिल प्रत्येक गोष्टिंवर
प्रेम करायला शिका…
प्रेमाची परिभाषा जाणुन
तसे वागायला शिका…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *