◼️ काव्यरंग :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर

🔴डॉ.बाबासाहेब आंबेडकर

४ एप्रिल १८९१ रोजी नररत्न जन्मले भिमराव रामजी आंबेडकर,
तथागत गौतम बुद्धाच्या विचारांनी घडविला लोकजागर…

ज्ञानार्जना करिता अपमानाचे सोसले चटके अनेक,
देश विदेशात घेऊनी शिक्षण झालात बॅरिस्टर,
प्रेरणास्रोत गुरु गैतम बुध्द,संत कबीर,म.ज्योतिराव,
मुकनायक चे जनक डॉ.बाबासाहेब आंबेडकर…

दलितांच्या हक्कांसाठी लढा उभारला चवदारतळे सत्याग्रह,
धारदार लेखणीतून मानवतेविरोधी दृष्कृत्यावर केला प्रहार,
प्रज्ञा,करुणा,समतेचा संदेश रुजविणारा महासागर,
दलितांचा मुक्तिदाता बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर…

स्वातंत्र्य,समता, बंधुता मानवतावादी तत्त्वांचा आग्रही महानायक,
भारतीय संविधानाचे शिल्प घडविणारा शिल्पकार,
सामाजिक समता प्रस्थापित करण्या झटणारा योध्दा झुंजार,
भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर…

१४ आक्टो १९५६ स्वीकारण्या बौद्ध धर्म दिक्षाभूमी ठरली नागपूर,
संघर्षमय जीवन जगणाऱ्यासाठी साहेब आहेत दिपस्तंभ,
६ डिसें १९५६ रोजी तेजस्वी सूर्य अनंतात झाला विलीन,
चैत्यभूमीकडे लाखोंनी उसळला पोरका झालेला जनसागर…

गुलामीचे साखळदंड तोडण्या प्रेरणा देणारा विचार महामानव,
सिध्देश वाहतो काव्यफुल डॉ.बाबासाहेब आंबेडकर…

◼️✍️नाव:-सिध्देश्वर दिलीप वायाळ.
मुं:- सावरखेडा (गोंधन),पो-सिपोरा (अं),
ता.जाफ्राबाद,जि.जालना.
फोन नं ९९२२४६२९०९.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *