ऊस “गोडाची खाणं”
खांडोळी कोयता करी
आस पून्हा जन्मा उरी
खांद्यास वाढ्यांचा भारं
आवडीनं खाई जनावरं
मणुष्याला आवडे ऊस
खुष पिऊन ऊसाचारस
दोन रूपं शुभ्र ,पिवळं
नावे गोड साखर,गुळं
जन्मठिकाणं ही वेगळी
साखर कारखाणे स्थळी
गुळ माळावरती शेतात
जन्माला येई गुह्राळात
आनंदात साखर पान
गोडधोडात गुळामान
साखरेस मुंग्यांची भिती
गुळास मुंगळेच लागती
मधूमेया साखर नकोशी
गुळ आरोग्यास पाठीशी
ऊस गोड लागला म्हणून
मुळासगट नसावचं खानंं