◼️ प्रासंगिक लेख :- डॉक्टर आंबेडकर आणि समाज परिवर्तन

डॉक्टर आंबेडकर आणि समाज परिवर्तन

उषःकाल होता होता
काळ रात्र झाली
अरे पुन्हा आयुष्याच्या
पेटवा मशाली……..

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक महान पुरुष, अतिशय बुद्धिमानी. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1811 रोजी महू (इंदूर) येथे झाला. त्यांचे वडील रामजी सपकाळ हे लष्करामध्ये सुभेदार होते. लष्करातील नोकरी सोडल्यानंतर ते कोकणातील दापोली येथे आले. तेथून ते सातारा येथे स्थायिक झाले. शाळेत अस्पृश्य म्हणून इतर मुले डॉक्टर आंबेडकरांना स्वतःजवळ फिरकू देत नसत. अस्पृशया वर होणारा अन्याय ,अत्याचार त्यांनी लहानपणापासूनच सहन केला होता.लहानपणी त्यांना काही उमजत नव्हते. उदाहरणार्थ विहिरीवर पाणी भरू न देणे, गावच्या बाहेर झोपडीत राहणे इत्यादी. अस्पृश्यता म्हणजे जीवन जगण्यास नकार. एका माणसाने दुसऱ्या माणसाला समाजात मुक्तपणे वावरण्यास दिलेला नकार.
प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी सरकारी हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. तेथेही महारपण आडवे आले. त्यांना तुच्छतेने वागणूक दिली जात असे. पण त्यातूनही एकटेपणाचा त्यांना फार फायदा झाला. त्यांनी पुस्तकांना आपले मित्र बनविले. शाळेत आंबेडकर गुरुजी फार चांगले होते.त्यांनी डॉक्टर आंबेडकरांचे सपकाळ हे आडनाव बदलून स्वतःचे आंबेडकर हे आडनाव त्यांना लावले. त्यांचे हायस्कूलचे शिक्षण मुंबई येथे झाले. एक महार मुलगा मॅट्रिक झाला, या बातमीने तर सर्वत्र खळबळ माजली. ठिकठिकाणी त्यांचा सत्कार झाला. त्यानंतर कोलंबिया विद्यापीठात त्यांनी एम. ए. ला अर्थशास्त्र विषय घेतला. नंतर त्यांनी पीएचडी पदवी सुद्धा घेतली. भारतीय समाजाने त्यांना बहिष्कृत केले होते, तरीदेखील सामाजिक परिस्थितीला तोंड देत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. पैशाच्या अभावी त्यांना पुन्हा भारतात यावे लागले.परंतु कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराजांच्या पैशाची मदतीने ते पुन्हा विलायतेला गेले. व तेथे एम एस सी इकाॉन व डी एस सी इकॅॉण आणि बार. अॅट. लाॅ. या पदव्या संपादन केल्या.
डॉक्टर आंबेडकर यांनी महाड येथे चवदार तळ्याच्या पाण्यासाठी सत्याग्रह केला. त्याचप्रमाणे देवळात प्रवेश मिळावा म्हणून नाशिक येथे सत्याग्रह करण्यात आला.
अस्पृश्य ते विषयी त्यांनी सामाजिक लढा दिला, ठराव संमत केले. विचार परिवर्तनाची धुरा चालविली. अस्पृश्यता दूर झाल्याशिवाय देशाचा विकास होणार नाही अशा मताचे ते होते. भारतीय घटनेतील आराखड्यात त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांना कायदेशीर स्वरूप प्राप्त झाले. राज्य घटना बनविण्याची सर्वात मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. म्हणून त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणतात. 14. 10. 1956 ला त्यांनी नागपूर येथे हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला.
आज रूढी-परंपरा बदलवून टाकून अस्पृश्य हा शब्द समाजातून निघून जावा यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी आपले संपूर्ण जीवन खर्ची घातले.
तेजस्वी व्यक्तिमत्व, शिस्त, वक्तशीरपणा, अभ्यासू वृत्ती, इत्यादी गुणांनी परिपूर्ण डॉक्टर आंबेडकरांनी समाज परिवर्तन करण्यात मोलाचा वाटा दिलेला आहे. त्यांनी शिक्षण क्षेत्राप्रमाणेच सामाजिक क्षेत्रातही बहुमोल कामगिरी केली आहे.
अशा या क्रांतीसुर्य मानवाचा मृत्यू 6 डिसेंबर 1956 ला झाला. साऱ्या देशात शोककळा पसरली. म्हणून 6डिसेंबर महापरि निर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो.

अशा महामानवास माझा कोटी कोटी प्रणाम. 

“सागराचे पाणी कधी
आटणार नाही भिमराया
भारतीय संविधान दिले देशाला
तुझे कार्य जाणार नाही वाया.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *