चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी रामू तिवारी यांच्या नेतृत्वात भाजपचा असंख्य महिला कार्यकर्त्यांच्या काँग्रेस मध्ये प्रवेश 

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी रामू तिवारी यांच्या नेतृत्वात

भाजपचा असंख्य महिला कार्यकर्त्यांच्या काँग्रेस मध्ये प्रवेश 
चंद्रपूर : राज्यात मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडी सरकारचा विजय झाला आहे. विकासाचे काम देखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडी सरकार काम करीत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि खासदार बाळू धानोरकर यांचा मार्गदर्शनात आज भाजपच्या महिलांनी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी रामू तिवारी यांच्या नेतृत्वात प्रवेश केला.
यावेळी कल्पना गिरडकर, चंदाताई इटनकर, इंदिराताई चोपकर, समता मगरे, मधुताई बावणे, अनिताताई झाडे, सुरेखाताई देवतळे यांच्यासह भाजपचा असंख्य महिला कार्यकर्त्यांच्या काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
यावेळी शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुनीताताई अग्रवाल, काँग्रेसचे नेते प्रवीण पडवेकर, माजी नगरसेविका एकता गुरूले,  विजय धोबे, कुणाल चहारे, अख्तर सिद्धीकी यांची उपस्थिती होती.
 चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी रामू तिवारी हे बोलताना म्हणाले कि, महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या ५८ वर्ष राखलेला गडाला भगदाड पाडून अभिजित वंजारी यांनी इतिहास रचला. पदवीधर मतदार संघाचे प्रश्नांची त्यांना जण आहे. मोठ्या प्रमाणात भाजपच्या अहंकार या निवडणुकीमध्ये दूर झाला. आता कॉग्रेस मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात भाजपची हुकूमशाही नष्ट करेल. पुढे देखील मोठ्या प्रमाणात शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकारी काँग्रेसच्या ध्येय धोरणावर विश्वास ठेऊन प्रवेश करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *