भारतरत्न !
जन्मे महापुरुष
महान भूमीवर,
अद्वितीय प्रतिभा
दीनबंधू वावर!
भिमराव रावजी
समाज सुधारक,
होते बाबासाहेब,
खरे मूक नायक!
समाजात क्रांतीचे
स्फुल्लिंग चेतविले,
भारतरत्न त्यांना
देशाने गौरविले!
निष्णात विधी तज्ञ,
अर्थशास्त्राचे तज्ञ,
राजनितीज्ञ, भारी
कायदेमंत्री, तत्वज्ञ!
स्वतंत्र भारताची
सार्वभौम घटना,
सर्वसामावेषक
संविधान रचना!
तळागाळातीलही
जनतेचा विचार,
आदर्श व्यक्तिमत्त्व,
दलितांचा कैवार!
शतकात निपजे
पुन्हा नसे निर्माण,
सहा डिंसेंबरला
महापरिनिर्वाण!
◼️✍️सौ. प्रिया प्रकाश गावडे, ठाणे.