◼️ काव्यरंग : सशस्त्र ध्वजदिन


सशस्त्र ध्वजदिन


सात डिसेंबरला
ध्वज दिन करतात साजरा
सैनिकांच्या बलिदानास
देश वासी करतात मुजरा

देशासाठी सैनिक
अहोरात्र झटतात
आभार व्यक्त करण्या
मानवंदना त्यांना देतात

निधी गोळा करून
वृद्धाश्रमांना देतात भेट
स्टीकर लावता छातीवर
सैनिकांना आदरांजली थेट

तिन्ही दलाचा अभिमान
असतो लष्कर ध्वज खास
वीर सैनिक प्राणांची आहुती देतात
अभिमानाचा असतो इतिहास

श्रद्धांजली वाहून
कोटीश:हा नमन जवानांना
सशस्त्र दिन आठवण ठेवून
भक्तिभाव अर्पू सैनिकांना

◼️सौ.भारती दिनेश तिडके, रामनगर,
गोंदिया. 8007664039

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *