◼️ काव्यरंग :- मूक समाजाचा नायक

मूक समाजाचा नायक

दिधला प्रकाश भिमाने
या अंधारल्या युगाला
प्रणाम करू या आपण
या मुकनायकाला।

भिमराव अमूचा नेता
मूक समाजाचा नायक
स्विकारूनी आव्हान सारे
झाले दिन दुबळ्यांचे रक्षक।

शिकवण दिधली तथागथाची
ज्योत लाविली धम्म क्रांतिची
प्रहार केला दांभिक समाजावर
नाळ तोडली विषमतेची।

आधार देऊनी निळ्या पाखरांना
माणुसकीला जपले भिमानी
मनी पेरले बिज समतेचे, बंधुत्वाचे
गेले नव्या युगाशी नाते जोडूनी।

मूक समाजाचा नायक बाबासाहेब
आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी
बाबांच्या चरणी पुष्प अर्पूनी आपण
सारे देशबांधव अभिवादन करू या।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *