गत 24 तासात 361 कोरोनामुक्त 71 नव्याने पॉझिटिव्ह ; चार मृत्यू

जिल्ह्यात गत 24 तासात 361 कोरोनामुक्त : 71 नव्याने पॉझिटिव्ह ; चार मृत्यू

 Ø  आतापर्यंत 19,221 बाधित झाले बरे

Ø  उपचार घेत असलेले बाधित 1,377

चंद्रपूर, दि. 8 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 361 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 71 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून चार कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 20 हजार 925 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 19 हजार 221 झाली आहे. सध्या एक हजार 377 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 56 हजार 821 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 33 हजार 603 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यांमध्ये एकोरी वार्ड चंद्रपूर येथील 72 वर्षीय पुरूष, गांधी नगर, ब्रम्हपुरी येथील 65 वर्षीय पुरूष तसेच यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येकी 70 वर्षीय दोन पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 327 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 302, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 14, यवतमाळ सात, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 71 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 19, चंद्रपूर तालुक्यातील पाच, बल्लारपुर दोन, भद्रावती आठ, ब्रम्हपुरी सहा, नागभीड चार, सिंदेवाही तीन, मुल तीन, सावली एक, गोंडपीपरी दोन, राजुरा पाच, चिमुर चार, वरोरा दोन, कोरपना एक, जीवती एक तसेच इतर ठीकाणच्या पाच रुग्णांचा समावेश आहे.

नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *