◼️ काव्यरंग : पाठलाग

पाठलाग


“कष्ट करुनि माझा पोशिंदा
करतोय सुखाचा पाठलाग”
“रात्रंदिवस राबूनही मात्र
संकटच करतय पाठलाग”

“विद्यार्थी शिकावी म्हणून
शिक्षक करतात पाठलाग”
“शाळा सुरू होत असताना
कोरोनाच करतोय पाठलाग”

“माणूस आयुष्यभर सुखाचा
करतो सारखाच पाठलाग”
“सुखाचे दिवस भोगताना
दुःखाचा असतो पाठलाग”

“खरं तर ध्येय गाठण्यास
स्वप्नांचाच करावा पाठलाग”
“परंतु स्वार्थ साधण्या माणूस
लोकांचा करतात पाठलाग”

“म्हणून म्हणतोय स्वप्नांच्या
ध्येयासाठी करावा पाठलाग”
“मग एकामागोमाग यशच
आपला वारंवार करेल पाठलाग”

✍️ (©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *