◼️ काव्यरंग :- पाठलाग

पाठलाग

आठवांचं हे आवर्तन
असंच घिरट्या घालतं
तू जवळ नसण्याचं
मग दुःख उरात सलतं

करत राहते पाठलाग
मीही खुळ्या क्षणांचा
तासनतास जिथं चाले
संवाद प्रीतवेड्या मनांचा

अधीर होते सांजवेळही
तिला कुठं असतं ठाऊक
तुझ्या भेटीसाठी होते रे
ती माझ्यासारखी भावूक

अंधारून येते रातही सारी
कवडसा आठवांचा येतो
पिंगा घालीत माझ्याभोवती
झोपेला नकळत तो नेतो

विरहाचे हे दान सख्या
नको रे आसवांना देऊ
चितारली सुखस्वप्ने त्यांनी
चल पैलतीरी त्यांना नेऊ…
चल पैलतीरी त्यांना नेऊ…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *