◼️ काव्यरंग : अंतिम ईच्छा!

कविता – अंतिम ईच्छा!

मि मरतांनी, तुला एकदाच
डोळे भरुन पहावं….
मि मरतांनी, तुझा श्वास एकदाच
माझ्या श्वासात गुंतावं…
मि मरतांनी, माझ्या कानात
तु सतत गुणगुणावी…
मि मरतांनी, माझ्या ओठातुन फक्त
तुझ्या नावाचं स्मरण व्हावं…
मि मरतांनी, फक्त एकदाच
तु माझा हात, हाती घ्यावीस…
मि मरतांनी, एकदा माझ्या देहास
तुझ्या स्पर्शाची जाणिव व्हावी…
मि मरतांनी, तु सतत माझ्याशी
मनभरुन बोलत राहावीस…
बस मला काही नको!
एवढं तुझं प्रेम घेऊन, मि शांत
डोळे मिटणार…
कायमचा तुझा चेहरा
या डोळ्यात कैद होणार…
शेवटी इतकंच :
माझ्या प्रेतास सफेद कापडाचा
आधार नको!
तुझ्या फाटक्या साडिचा
पदरच मला हवा!  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *