◼️ काव्य रंग : साहेब,आज तुम्ही हवे आहात…!!!

साहेब,आज तुम्ही हवे आहात…!!!

साहेब,आज तुम्ही हवे आहात…!!!
हरवलाय,
आमच्यातला स्वाभिमान,
विसरलोत,
स्वतःचीच अस्मिता,
आमच्या डोक्यात,
एकदा प्रकाश टाकून जा….
साहेब,
एकदा तुम्ही येवून जा….
विळे,कोयता,
झाल्यात बोथटलेली पाती,
हरवलीय आमच्यातली,
आपआपसातली नाती,
विस्कटलेले मोती,
एकत्र करुन जा….
साहेब,
एकदा तुम्ही येवून जा….
झोपडी झाल्या,
पार्टीची स्थळे,
राजकारणा पोटी,
नाही राहिली प्रार्थनास्थळे,
या सारख्या गोष्टींना,
नष्ट करुन जा….
साहेब,
एकदा तुम्ही येवून जा….
नाही राहिली,
भीती कोणाच्या बापाची,
चुरगळलीत पाने,
तुमच्या इतिहासाची,
या पुस्तकाला,
एकदा कव्हर लावून जा….
साहेब,
एकदा तुम्ही येवून जा….
तुम्हीच आहात,
आमचे दैवत,
तुमच्या कार्याला,
होवू नतमस्तक,
रंजल्या,गांजल्यांना,
एकदा आर्शिवाद देवून जा….
साहेब,
एकदा तुम्ही येवून जा….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *