भूमिगत
मायभूमीला स्वतंत्र करण्या, घरदार सोडले होते
क्रांतिवीर ते देशासाठी भूमिगत राहिले होते
परकियांच्या गुलामीतूनी स्वतंत्र करण्या भारतभू
त्यांनीच छातीवरती कैक वार झेलले होते
लुटला जायचा देश माझा, जुलमी सत्तेत इथे
या मातीवर अन्यायाचे पातक माजले होते
क्रांतिविरांनी देशासाठी, मरणालाही झिडकारूनी
उभे आयुष्य तळपत्या निखाऱ्यावर ठेवले होते
प्राण लाविले इथे पणाला, मुक्त करण्या मातीला
इथेच स्वातंत्र्यसंग्रामाचे रान पेटले होते