◼️ काव्यरंग :- उमललेली फुले गोजिरी

उमललेली फुले गोजिरी


माझ्या सुंदर बागेत
उमललेली फुले गोजिरी
मन आनंदाने डुले
पाहून सुगंधित फुले साजिरी

पारिजात बहरून आला
गुलाब मोगरा जाई जुई
प्रसन्न रम्य वातावरण
फुलांच्या दुनियेत मज नेई

चाफा, कन्हेर जास्वंद
चंपा चमेली वेली मांडवावरी
आशेची किरणे पालवती
सोनचाफा गंध पसरे वाऱ्यावरी

शेवंती पिवळी धमक
रातराणीचा सुगंध पसरला
बगीचा ला आले स्वर्गाचे रूप
वातावरणात सुगंध दरवळला

देवघर सजले फुलांनी
मंदिरात अर्पूनिया फुले छान
देवाच्या चरणी शोभे
सर्वांनाच आवडे फुले महान

फुले आपल्याला देती जीवना
नवे आकार नवी उमंग
उमलता कळी फुलांची
जीवनात मनी उठतो तरंग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *