◼️ काव्यरंग : स्वप्नभंग ✍️ सदस्य मराठीचे शिलेदार समुह

मराठीचे शिलेदार कविता, चारोळी समूहातील सर्व समूहात दि. १२/१२/२०२० रोजी घेण्यात आलेल्या ‘शनिवारीय काव्यस्तंभ‘ स्पर्धेतील ‘स्वप्नभंग‘ या विषयावरील सर्वोत्कृष्ट ३ काव्यरचना.

स्वप्नभंग

तुझ्या माझ्या संसाराचे
स्वप्न रंगवायचे आहे
हातात हात घेऊन
नौका पार करायची आहे

तुझ्या माझ्या अस्तित्वाची
येथेच खरी अग्निपरिक्षा आहे
घराचा तो पाया दोघांच्या
विश्वासावर उभा करायचा आहे

घरातील एक एक ती वीट
प्रेमाच्या धाक्यात जोडायची आहे
भिंतीवरील त्या रंगात
वात्सल्याचा रंग भरायचा आहे

रंग ते भरतांना कदाचित
स्वप्नभंग होणार आहे
निराशाला हावी न होता
सुर्य उद्याचा पाहायचा आहे

हीच मनी आशा ठेवून
एकमेकाला साथ द्यायचा आहे
दोघांनी पाहिलेल्या स्वप्ननानां
पुन्हा नव्या जोमाने साकार करायचे आहे

सुधा अश्वस्थामा मेश्राम
अर्जुनी/मोर.गोंदिया
©मुख्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समुह
🚩🦚🚩🦚🚩🦚🚩🦚🚩🦚🚩🦚
स्वप्नभंग

किती गेले किती
आले मोजमाप
नाही हातातल्या
ओंजळीत घट्ट
बांधून ठेवली
स्वप्नभंग पाहत
राहिले आयुष्यात
सुख दुःख वेचत
धाग्याने बांधून
घेतले वाट कुठे
चुकली दिशा
नाही कळल्या

आईच्या गर्भात
नऊ महिने पोटाशी
बाळगुन ठेवणारी
आई आपल्याला
जन्म देणारी मायमाऊली
ह्या दुनियेची ओळख
तिच्या दुधाची तहान
भागविणारी तेच स्वप्न
नका करू तिचे स्वप्नभंग

सुख दुःख, चांगले वाईट
शिकुन येत नाही चावुन
खाव लागते रस्त्यावर
चालतांना वाटा नसतात
माहित आपनच समजून
घ्याव्या जीवनाच्या वाटेत
नागमोडी वळणे आहेत
वाट सोडु नये खडा रूतला
तोंडाला खडा लागला

स्वप्न बघितले स्वप्न साकार
नाही झाले तुला शोधन्या
निघालो तु थांबलास नाही
घड्याळाचा काट्यांचा वेळ
थांबत नसतो सुर्य चंद्र
उगवतो आणि मावळतो
त्याच्या वेळेनुसार तो
चालत असतो

सावित्रीबाई फुले ह्यांनी
जगकल्यानासाठी स्वत:ला
कधी कमी समजले नाही
प्रत्येक गोटे,शेण,माती
लोकांच्या शिव्यां तरी
डगमगल्या नाही स्वत:
गंभीर राहीलेल्या स्वप्नभंग
नाही झाल्या

माणसाचा जन्म चांगल्या
कर्तृत्वाची देणच असावी
विचार आशा आकांक्षा
स्वप्न हेच तर जीवनाचे
खरे सामर्थ्य माझे माझे
म्हणुनी मोह नाही सुटला
मातीत मिसळणार कोण
जाणे तु गेल्यावर तुला
हसणार की रडणार
कशाला रंगवितो ही स्वप्ने

सौ. नंदा कामडी, चंद्रपूर
© सदस्य मराठीचे शिलेदार समुह
🚩🦚🚩🦚🚩🦚🚩🦚🚩🦚🚩🦚
स्वप्नभंग

जीवनात या गरीबीच्या
टोक दुःखाचे घोळले..!!
जीवनाच्या या रंगमावर
भाव सुखाचे पोळले..!!

रिकाम्या खिश्यानेच मज
रूप समाजाचे कळले..!!
आजही उपाशी पोटी
शरीर भुईवर खिळले..!!

आपल्याच लोकांनी मज
दिले अगणित घाव..!!
सुकल्या ओठांनी असतो
माझा देवाकडे धाव..!!

गोल भाकरी मिळविण्याचे
स्वप्नभंग माझे झाले..!!
उसवता लक्तरे देहाची
अंत करण्यास आले..!!

🔴  भावना गांधिले.,अ.नगर
©सदस्या मराठीचे शिलेदार समूह
🚩🦚🚩🦚🚩🦚🚩🦚🚩🦚🚩🦚

मुख्य प्रशासक/संपादक
राहुल पाटील
७३८५३६३०८८
मुख्य परीक्षक/प्रशासक
सौ सविता पाटील ठाकरे
➖➖➖➖🍁🌿🍁➖➖➖

One Reply to “◼️ काव्यरंग : स्वप्नभंग ✍️ सदस्य मराठीचे शिलेदार समुह”

  1. श्रीमती सुधा अश्वस्थामा मेश्राम अर्जुनी/मोर.गोंदिया says:

    माझ्या ‘स्वप्नभंग’या कवितेला उत्कृष्ट म्हणून पहिला स्थान दिला ह्रदय आनंदाने भरून आले..याचे श्रेय मराठीचे शिलेदार समुहाचे प्रशासक राहुल पाटील ,पल्लवीताई,सविता ताई , वैशालीताई यांना जाते..यांचे मी सतदा ऋणी..तसेच सप्तरंगाचे संपादक माननीय विठ्ठल आवळे सर यांचे मनापासून आभार..सदैव त्यांच्या ऋणात राहु इच्छेते…🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *