सरपण
घेवून हाती कुऱ्हाडी
बाप धुंडाळी कुपाटी
सूर्य उन्हाच्या घावात
घाम अंगाला फुटे
साळता फांदीचे काटे
पटकर अंगावरच फाडे
घुसून बोटात काटा
रक्ताची चिळकांडी उडे
कधी येईल बाप घरी
माय वाट ती पाहे
सरपणा वाचून तिची
चूल बंद हो राहे
घेऊन येई बाप
डोईवर सरपणाची मोळी
पेटवून चूल फुके
फुकारीने माय ती भोळी
माय थापता भाकरी
भरे झोपडी धुराने
मायेचे डोळे वाहती
भरून अश्रूंच्या पुराने
◼️ सौ संगीता म्हस्के पुणे
सदस्य मराठीचे शिलेदार समूह