मनोबल
किती ही संकटे आली तरी
मनोबल ढळू देऊ नये॥
आपल्या चित्तवृत्तींना कधी
नैराश्याकडे वळू देऊ नये॥॥॥॥
जीवनात सुखदुःखें येतच राहतील
नवनवें अनुभव देतच राहतील॥
आपल्या मनावर काबू ठेऊन
वास्तवापासून पळू देऊ नये॥॥॥॥
ह्रदयातील आतील कप्प्यामध्यें
लपवून ठेवावे दुःख आपुले॥
आपल्या यातनांची तीव्रता
जगास कधी ही कळू देऊ नये॥॥॥॥
आपल्या परास्थितीचे कधीही
करू नये प्रदर्शन॥
हितशत्रुंना विकृत आनंद
कधीच मिळू देऊ नये॥॥॥॥