◼️ काव्यरंग : निसर्गाचे उपकार

निसर्गाचे उपकार

निसर्ग आपला मित्र
निसर्ग आपला सखा
निसर्ग सदा करी उपकार
नेहमी वाटे नवखा

सूर्य देतो तेजाची
किरणे पहाटेच्या वेळी
लखलखता प्रकाश देई
सर्वांसोबत समान खेळी

वृक्षवल्ली सोयरे वनचरे
निसर्गाचे अनेक रूप
जीवन जगण्याची साधने
देती निसर्ग सर्वांना खूप

हवा पाणी मिळते निसर्गातून
वृक्षा पासून मिळती फळे
पानफूल खोड सारेच महत्त्वाचे
उपयोगी असतात मळे

निसर्गातच वाढतो आपण
अनुभवाच मिळते लेण
निसर्गाची आठवावे रूप
मानवतेचे जपावे देणं

मनुष्य झाला स्वार्थी
निसर्गाचे रक्षण न करी
पर्यावरणाचा करतो -हास
निसर्गाचे उपकार असते तरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *