◼️ काव्यरंग : चिवट कोरोना

चिवट कोरोना

किती चिवट हा कोरोना
जाता जाईनाच झालाय
मानगुटीवर भुतासारखा
जणू आमच्या बसलाय

गणपतीत नाही बॅन्जो
झाले बापूडे विसर्जित
दसराही सरला तसाच
या कोरोनाच्या मर्जीत

दिवाळी आली न् गेली
नाहीत उडवले फटाके
तरीही या दुष्ट कोरोनाने
नाही कुणापुढे हा वाके

काय हवेय बाबा रे तुला
कधी तू इथून टळशील
टाळ्या थाळ्या वाजवून
वाटले लगेचच पळशील

तळ ठोकूनच राहिलास
जीवनच बनलेय नीरस
ना नाटके मॉल्स शॉपिंग
सरले मास मुव्ही पाहून

टळ बाबा रे आता तरी
मास्क लावाया कंटाळा
श्वासही घेता येतच नाही
तोंडाला आपसूक टाळा

नाहीतच गळ्यात गळे
घातलेत प्रिय मित्रांच्या
फोनवरूनी मिळवल्या
नोटस् वह्याही सत्रांच्या

किती दिवसांचा पाहूणा
बनुनी आलास बाबा तू
कंटाळले आजीआजोबा
बोलून खट्याळ मी नातू

मन रमवायलाही नाहीच
उघडे मॉल अन् थिएटर
घराच्या खिडकीतून पहा
बाहेरचे काही सटरफटर

मुक्त होऊन हूंदडायचेय
आम्हालाही आता खूप
नवनवीन कपडे घालून
न्याहाळायचे सुंदर रूप

कोरोनामुळे जीवन झाले
आमचे आता कवडीमोल
कधी होई फिरून पूर्ववत
आयुष्य आमचे अनमोल

लसीकरणाची ही प्रक्रिया
वाटतेय कधी होईल पूर्ण
शाळा-कॉलेजे नाही चालू
तरीही जीवन सारे अपूर्ण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *