ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात आढावा बैठक
राजुरा : तालुक्यातील 28 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना राजुऱ्याच्या वतीने आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीत जिल्ह्याचे शिवसेना प्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या नेतृत्वात विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यात शिवसेना पूर्ण निवडणुका स्वबळावर संपूर्ण ताकतीने लढून प्रत्येक ग्रामपंचायतीवर भगवा फडकवु असा निर्धार करण्यात आला.
शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुखाच्या नेतृत्वात चालू असलेल्या तयारीमुळे तालुक्यात विरोधकांना धडकी पोहचली आहे.
याप्रसंगी शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख बबनभाऊ उरकुडे, नगरसेवक राजूभाऊ डोहे,निलेश भाऊ गंपावार, तालुका प्रमुख विगोज राजूरकर, संघटक नरसिंग मादर, शहर प्रमुख भूमन सल्लम, उपतालुका प्रमुख रमेश झाडे, बंटी मालेकर,असिफ शेख, मनोज कुरवतकर, सुनील गौरकार, महिला उपसंघटिका सरिताताई कुडे, आशाताई उरकुडे, कलावतीताई इंदुरवर, सुरेखा तलांडे, दीपिकाताई पंदीलवार, सुनिता जमदाळे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.◼️