◼️ काव्यरंग : काव्यमहिमा ✍️ मराठीचे शिलेदार समूह सदस्य

 

मराठीचे शिलेदार कविता, चारोळी समूहातील सर्व समूहात दि.१६/१२/२०२० रोजी घेण्यात आलेल्या ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेतील ‘काव्यरत्न‘ या विषयावरील सर्वोत्कृष्ट ३ काव्यरचना. आपले मत, सूचना व अभिप्राय ‘सप्तरंगास’ कळवावे.

काव्यमहिमा

काव्य म्हणजे हृदयातून
ओसंडून वाहणारा झरा
निळ्या आकाशात
लुकलुकणारा तारा

काव्यमहिमा म्हणजे
शब्दरुपी सुमनांची बाग
काव्यपुष्पांचा निनादतो
सप्तसुरातील राग

काव्यमहिमेतून बहरले
भाषेचे सौंदर्य
रसदार शब्दांची फळे
चाखून कळते शब्दसामर्थ्य

काव्यमहिमा जणू रसिक
साहित्यरत्नांची खाण
नवप्रतिभेच्या साक्षीनं
करी घेतात शब्दरूपी बाण

◼️संदीप मेश्राम(गोंदिया)
©मराठीचे शिलेदार समूह सदस्य
📚✍️📚✍️📚✍️📚✍️📚✍️📚✍️
काव्यमहिमा..

काव्यमहिमेचा साज
काय वर्णू मी पामर..
काव्य जगताची माय
घाली वेदनेवर फुंकर..

काव्य पाझरणारा माठ
देहात फिरणारा श्वास…
बरसणा-या या अश्रूंना
सदा पापण्यांची आस…

अंकुरूनी ते मातीत
पाने वाजविती शीळ…
जशी कान्हाची बासुरी
गीत सुस्वर ते मंजूळ…

कधी ओळीतून भुरभुरे
बाळाच्या जावळापरी…
आसमंती याची दरवळ
गंधित सोनचाफ्यापरी…

क्षण हर्षाचा मग येता
फुटे काव्याला पालवी…
अंतरीच्या वणव्याला
दवा बनवून ते विझवी…

काव्यमहिमेची महती
काय गा म्या वर्णावी…
जीवनाचे सुवर्ण क्षण
हृदयात मी या जपावी…

🔴 सौ.सविता पाटील ठाकरे. 
सिलवासा,दादरा नगर हवेली.
©प्रशासक,मराठीचे शिलेदार समूह
📚✍️📚✍️📚✍️📚✍️📚✍️📚✍️
काव्यमहिमा

अंतरीच्या गाभाऱ्यातून
उगम होतो शब्दांचा
गुंफुनीया शब्द न शब्द
वाहतो झरा काव्याचा

काय वर्णावा काव्यमहिमा
ठाव घेई मना मनाचा
लेखनीतूनच प्रतिबिंब दिसे
जीवनातील सुख दुःख प्रेमाचा

उचंबळून येती मनी भावना
कधी वास्तवी कधी आभासी
काव्यातुनी करतो जागृत
वर्तमान भुत भविष्याचा मानसी

समृद्ध माझी माय मराठी
अलंकारिक सजली नवरसांनी
अनमोल रत्नापेक्षाही मौल्यवान
शब्द सामर्थ्याची आहे जननी

शब्दही अपुरे पडती
गौरव काव्यमहिमा वर्णाया
अखंड काव्यदिप तेवावा
कधीही न जाओ लया

🔴 सौ. रुपाली म्हस्के मलोडे, गडचिरोली

©सदस्या मराठीचे शिलेदार समूह
📚✍️📚✍️📚✍️📚✍️📚✍️📚✍️

मुख्य प्रशासक/संपादक
राहुल पाटील
७३८५३६३०८८
मुख्य परीक्षक/प्रशासक
सौ सविता पाटील ठाकरे
➖➖➖➖🍁🌿🍁➖➖➖➖

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *