◼️ काव्यरंग : मृत्युचा आड

मृत्युचा आड

यात्रेत जत्रेत उरूसास

गर्दीच्या ठिकाणी खास

विसएक फुटाच्या उंचीचा
साठा फळया लोखंडाचा

जिन्यावरून जाता येत
गॅल२ीत डोकावे लागत

जुनाटगाडी गोंगाट करी
कलाकाराची अदा भारी

चालवणारा सोडतो हात
धडधड होतीच हदयात

कसरत चारेक मिनीटाची
थोडेफार पैसे कमवायची

टिचभर अशा पोटासाठीच
खेळं जीवमुठीत धरूनच

करमणुक होई जरावेळ
नसत्तो खरचं पोरखेळ

जगण्यासाठी ही धडपड
नाव “मृत्युचा आड”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *