Slug पक्षी सप्ताह निमित्त मुडाना येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा सत्कार

Slug पक्षी सप्ताह निमित्त मुडाना येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा सत्कार

यवतमाळ : दिनांक 18/12/2020 शुक्रवारी वन विभाग परिक्षेत्र महागाव यांच्या वतीने दिनांक 5 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर या कालावधीत पक्षी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या पक्षी सप्ताहानिमित्त जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा मुडाणा, पंचायत समिती ,महागाव. जिल्हा यवतमाळ .या शाळेत विविध प्रकारचे उपक्रम घेऊन पक्षी सप्ताह साजरा करण्यात आले यामध्ये चित्रकला, स्पर्धा निबंध, स्पर्धा पक्षी सप्ताहानिमित्त घेण्यात आले होते. या स्पर्धेत शाळेतील विद्यार्थीनीं सहभाग नोंदविला होता. या पक्षी सप्ताहात चित्रकला स्पर्धांमध्ये अनुक्रमे, यश गजानन जाधव (प्रथम क्रमांक ),साहिल विजय आहाळे( द्वितीय क्रमांक) आर्शिया आयाजखाँन पठाण (तृतीय क्रमांक) व निबंध स्पर्धेत कुमारी प्राची गजानन गोपेवाड (प्रथम क्रमांक) पवन बाळू धोत्रे द्वितीय क्रमांक) साक्षी पांडुरंग गोरे (तृतीय क्रमांक) या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक अवधूत वानखेडे सर, गजानन गोपेवाड सर , यु व्ही गोविंदवार मॅडम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *