◼️ काव्यरंग : न्याय

😢 Justice / न्याय 😢

तुझी सुरवातच अनिश्चिततेतून झाली,
बुरखा घातलेल्या वांझोट्या
समाजाला तू फक्त भोग वस्तू भासली,
तू होती आहेस अन राहणार चडीचूप
याच नजरेतून तू पाहिली गेलीस,
तुझी चूक नाहीच ग यात काहीही
चूक आहे त्या समाजाची
चूक आहे त्या माणुसकीची
चूक आहे त्या रूढी,परंपरांची
चूक आहे त्या नराधम व्यवथेची
अन चूक आहे तू स्त्री असण्याची,
माणसांचा वावर नाहीच मुळे इथे,
इथे राहतात हिंस्त्र पशु,
अन त्यांच्या दावणीला बांधलेल्या
लाचार पाळीव मानसाळलेल्या
माणूस म्हणून घेणाऱ्या किड्यांची,
जे फक्त बोटं फिरवतात
टूजी फोरजी वरणं अन
झोपी जातात दाराची कडी लावून,
तुझा श्वास थांबला ते
यांच्या लेखी बरे झाले नाहीतर
रंगले असते भगवे,निळे,हिरवे
वातावरण तुझा असण्याने,
चघळले असते तुझे प्रकरण
मीडियाने चोथा होईपर्यंत,
पांढऱ्या बगळ्यांचे विचारूच नको
त्यांच्या सोईने झाले असते
रोज तुझ्यावर अत्याचार,
पेटून उठायला हवे होते की ज्यांनी
स्त्रीच्या योनीतुन जन्म घेतला
नाही असे होणार नाही कारण
इथे माणूसपणाला जगणारा कोणीच नाही,
तुझे श्वास थांबले बरे झाले
तू सुटलीस या यातनांच्या जगण्यातून
तू वाट पाहत रहा नक्की कारण
अजून येतील नीशब्द,विनासायास
जगू म्हणणाऱ्या कित्येक जणी
तुझ्या सारख्याच
जगण्यातून सुटायला !!!!

🔴अविनाश आशा राम सोनटक्के
9595989809

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *