गझल
सुखाला दाबतो मी दु:ख सोसाया
हसावे खास तूही पेच सोडाया
फुला पाहून काट्याने रुसावे का
ऋतू बदले कळीला नित्य फुलवाया
कुठे का खुट्ट वाजावे पदरवाने
सखीचे लाजणे खुलवी मनाला या
नवी ही बाग सुगंधित कशी सांगू
कळ्या भृंगारवाने लाजणाऱ्या या
नभाला चांदण्यारात्री साद घालावी
जरासे पावसाला आवराया या
◼️✍️ प्रकाश रामचंद्र क्षीरसागर