साखरवाही येथे आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

साखरवाही येथे आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवसेना माजी उपजिल्हा प्रमुख बबनभाऊ उरकुडे यांची उपस्थिती

राजुरा : हिंदू हृदय सम्राट स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आद. उद्धवसाहेब ठाकरे पुढाकारानेआणि जिल्हा शिवसेनेचे प्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनात शिवसेना, युवासेना महिला आघाडी तालुका राजुरा व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई -ठाणे यांच्या सयुंक्त विद्यमानाने राजुरा तालुक्यातील संपूर्ण गावात मोफत आरोग्य तपासणी, नेत्र परीक्षण, चष्मा व औषधी वाटप शिबिराचे आयोजन केले आहे.
त्याच पार्श्वभूमीवर आज साखरवाही येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
गावातील 120 महिला आणि पुरुषांनी या नेत्र परीक्षण आणि आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
कार्यक्रमाच्या सुरवातीला शिवसेना नेते बबनभाऊ उरकुडे यांच्या उपस्थितीत सुरवात करण्यात आली. गावातील कार्यकर्ते गणेश परसूतकर आणि युवकांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *