वीरगती
भारतमातेसाठी मला
वीरगती मिळाली आज
नको अश्रू ढाळू प्रिये
विरपत्नी तुझा साज…!!१!!
मातेच्या रक्षणार्थ आज
गोळी घुसली छातीत
अखेरचा श्वास घेतला
माझ्या मातेच्या कुशीत…!!२!!
मातेच्या स्वातंत्र्यासाठी
क्रांतिवीर गेलेत फाशी
मातेच्या रक्षणार्थ मला
वीरगती मिळाली अशी…!!३!!
क्रांतिवीर सोसून फाशी
केली स्वतंत्र भारतभूमी
मातेचे रक्षणार्थ लढ तू
जशी मर्दांगिनी लक्ष्मी…!!४!!
झेलून गोळी छातीवर
तिरंग्याचे मिळे कफन
वीरगती भाग्य लाभले
हिंदुस्थान प्यारा वतन…!!५!!
✍️सौ-राजश्रीताई मिसाळ ढाकणे बीड
कवयित्री/लेखिका/सदस्या
मराठीचे शिलेदार समूह