◼️ काव्यरंग : माझी मुलगी माझा अभिमान

माझी मुलगी माझा अभिमान

माझी मुलगी आहे
माझा अभिमान छान
प्रीतीचा झरा आहे
सर्वांची ती शान

अप्सरा असते मोहक
स्वर्गातील जणु परी
माझी मुलगी माझ्यासाठी
सौंदर्यपूर्ण सरी

रूपानी तसेच गुणांनी
आहे परिपूर्ण मूर्ती
माझा आहे अभिमान
भावनांची करते ती पूर्ती

भुरभुरणारे केस तिचे
मधुर मोहक अल्लड हसते
सर्वांना ती भावते
गोड गोजिरी ती मनात बसते

लाल गुलाबी तिचे ओठ
स्मितहास्य असते गाली
रूप लावण्य मनोहर तिचे
ओठावर असते जणू लाली

माझी मुलगी माझा अभिमान
मला वाटे भारी माप
सर्वांची आवडती ती
कौतुकाची पडती थाप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *