◼️ काव्यरंग : पोर्णिमा… ?

🔴 पोर्णिमा.. ?

कोमुद्रीच्या मांडीवरती निजला चंद्रमा
शर्वरी ही गाढ झोपीत असूनी पोर्णिमा….

ही रात खेळीमेळीची…. आहे सुनसान
पवन ललकारी देतो… स्तब्ध आहे पान
ही रात जरा ललित…. खुप भयान
लाख पसरले चंद्रकर अंधारात जमा…..
शर्वरी ही गाढ झोपीत असूनी पोर्णिमा….

तेजस्वी ही रात फसवी…. स्मरण अमावस्येचे
तुषार पडले पल्लवीवरती…. दाट धुके अश्रुंचे
परिमळ पसरला चहुबाजू…. अधिकार ना श्वसणाचे
निरपराध होते जखमी कुणास थोडी तमा…..
शर्वरी ही गाढ झोपीत असूनी पोर्णिमा…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *