◼️ काव्यरंग : संत गाडगेबाबा

संत गाडगेबाबा

गाडगेबाबांनी स्वेच्छेने ;
गरिबीची राहणी स्वीकारली,
पोटाची खळगी संपे का नाही;

त्यांनी चोरी चकारी ,कर्ज बाजारी नाकारली .

अंगावर जरी फाटकी चादर,
त्यातही मोठे मोठे ठिगळ,
रोज चाली धुळमातीतून,
तरी वस्त्रावर ना एकही मळ.

त्याचे वस्त्र नव्या सारखे चमकत, जणू घातली आहे, हिरा- मोत्याची माळ,
श्रमाच्या खापरातून खाये भाकर, स्वतःचं रक्त ही सोसते, हे स्वच्छतेचे झाड.

स्वच्छता आणि चारित्र्याची शिकवण द्यायचे,
जशी ही चालती बोलती पाठशाळा,
म्हणे, देव दगडात नसून आहे ते माणसात; मरू मरू सांगते मी; ऐक रे माणूसरुपी दगडा.

तिर्थी धोंडापाणी देव, रोकडा सज्जनी, असे म्हणुनी; दीन दुबळे, अनाथांची सेवा करत,
पूर्ण जीवन यात वेचले; अंधश्रध्दा दुरकरण्यात,
भोळ्या भाबड्या, अज्ञान लोकांना शिकवण्यात.

समाज कल्याणासाठी गावोगावी चालले;
किर्तन-भजच्या साधनाने स्वच्छतेची “बी” पेरत,
अस्पुश्यता रूढी परंपरा मोडत;

जाती-भेदाची वात विझवत.

लोक जागृतीसाठी रडत राहिला

सदैव अंधप्राशांचा प्रखर,
घरदार सोडून निघाले;

सुधारण्यास संसार,
माणसात शोधू लागले ईश्वर.

◼️नितेश खरोले, मोबा. 8329454924.
गोरेगाव. गोंदिया. शिक्षण .11वी.(सुरू)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *