◼️ काव्यरंग : माणसा माणसा जागा हो

माणसा माणसा जागा हो


माणसा माणसा जागा हो
राग काम द्वेष मत्सर कर दूर
माणुसकीला जपत जीवनी
आशेच्या किरणाचे धर सूर

धर्म जात पंथ संप्रदाय
विसर सारे भेदाभेद
माणुसकीची नाती जप
आठव सारे कुराण वेद

विकृतीला तू दूर कर
मानवतेचा धर्म मोठा छान
साधू संताची शिकवण आठव
सृजनशील विचार हवे महान

भ्रष्टाचार भ्रुणहत्या थांबव
दीनदुबळ्याचा हो आधार
गोरगरिबांना मदत कर
प्रेमाचा धागा हो साधार

प्रेम आपुलकी नातीगोती
जिव्हाळ्याने तू मनाशी जप
प्रबळ इच्छाशक्ती ठेवून
जनकल्याण कर्माशी तप

सदसद्विवेकबुद्धी जागवून
आत्मविश्वास ठेव खास
माणसा माणसा जागा हो
सत्कर्मा चा राहो अधिवास

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *