पूरग्रस्त ब्रम्हपुरी तालुक्याची पाहणी केंद्रीय पथकाने साधला नागरिकांशी संवाद

पूरग्रस्त ब्रम्हपुरी तालुक्याची पाहणी केंद्रीय पथकाने साधला नागरिकांशी संवाद

Ø  राज्य शासनाकडून आतापर्यंत 42 कोटीची मदत

Ø  पायाभूत सुविधांसाठी आणखी मदतीची गरज

चंद्रपूर दि. 25 : केंद्रीय पथकाने आज चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी  तालुक्यातील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. पूर येऊन गेल्यानंतरच्या कालावधीत शासनाकडून पंचनामे पूर्ण झाले आहेत. आत्तापर्यंत 42 कोटींची मदत देण्यात आली. मात्र तरीही पायाभूत सुविधांमधील अनेक मोठी कामे अपूर्ण असून यासाठी आणखी मदतीची गरज असल्याची मागणी नागरिकांनी पथकापुढे आज केली.

30,31 ऑगस्ट व एक सप्टेंबर या कालावधीत वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गोसेखुर्दचे 33 दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे  ब्रम्हपुरी, मुल, सावली, गोंडपिंपरी,  सिंदेवाही या 5 तालुक्यांमध्ये कोट्यवधीचे नुकसान झाले आहे. यासाठी तातडीने पंचनामे करून राज्य शासनाने आतापर्यंत 42 कोटी  कोटींची मदत मंजूर केली. त्यापैकी 36 कोटी चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले आहेत. राज्य शासनाने या पुरामध्ये झालेल्या जीवितहानी, पशुधनाचे नुकसान, पूरग्रस्त भागामधील पुनर्वसन, तात्पुरता निवारा, कृषी मालाचे नुकसान, पुरानंतर जीवनावश्यक वस्तूंचे वाटप,  दुकानदारांना मदत अशा अनेक घटकांमध्ये आतापर्यंत 36 कोटीचे वाटप केले आहे. उर्वरित 6 कोटी रुपयांचे  वितरण लवकरच करण्यात येत आहे◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *