◼️ मर्मबंध लेख : प्रेमपत्र..( काल्पनिक)

प्रेमपत्र..( काल्पनिक)

प्रती,
स्नेहरूपी सखे…
या काळजातून त्या काळजात जाऊन उरलेलं इतक्या दिवसाचं प्रेम, तसेच माझ्या आयुष्यातील आनंदाचे क्षणही तुला लाभो, या क्षणाची भेट..! ईश्वर तुला अगदी सुखात ठेवो हीच मनोकामना..!
सखे कशी आहेस गं तू ?.. मी अगदी मजेत आहे, माझी चिंता उगीच नको करू तू. मला तर तुझी खूप काळजी वाटते ! घरचे सगळे कसे आहेत ? काका,काकू, आजोबा वगैरे. बरे आहेत ना..सगळे..? .. का ? गं आपण एकमेकांशी भेटून बोलू शकत नाही हे तर ठाऊक हाय ना तुला..?. मग का तू कॉल,मॅसेज वैगेरे करत नाही..? लॉकडाऊन मध्ये काळजी वाटते ना आपल्या माणसांची.
हृदयाजवळ असलेल्या माणसांची. तू तर मॅसेज सुद्धा करत नाहीस..! विसरलीस ना मला..? इतक्या दिवसाची घट्ट फ्रेंडशिप तरी सुद्धा…. छान आहे. अशीच असते फ्रेंडशिप. आजच्या युगामध्ये मित्रांशी फक्त कामापुरतं बोलायचं, जोपर्यंत आपल्याला त्याची मदत हवी असते तोपर्यंत त्याच्याशी बोलायचं..नंतर त्याला useless सारखं फेकून द्यायचं. समोर आला तरी त्याच्याशी परक्यासारखं वागायचं… तू पण माझ्याशी असंच वागते का ? आठवण नव्हती माझी ? असा प्रश्न अजिबात करू नको.. आठवण परक्याची होते, आपल्याची नाही होत . तुझ्या डोळ्यांना माझंही दुःखं दिसावं, तुला जाणावावी माझ्या हृदयाची धडधड , त्त्या धडधडीचा आवाज तुझ्या कानापर्यंत पोहचावा. माझ्या काळजातले घाव तुला देखील दिसावे.माझे प्रश्न सोडविण्यात तुझी मदत व्हावी, म्हणूनच हे प्रत्र लिहितोय…!

सखे..! खूप दिसं झालीत… तुझ्याशी भेटण्याची.. इच्छा उरात होती ; पण हे शक्य नाही. माझ्या काळजातली रहस्यमय गोष्ट तुला स्वतः सांगावी, पण ते जमत नाही. सखे..! खरं तर खूप दिवसांपासून तुझ्याशी बोलायचं होतं ; पण ते राहूनच जायचं. तुझ्याशी ती गोष्ट शेअर करताना, माझं मन नकार देत होतं. घाबरत होतं. मी आज मोठ्या हिंमतीने मोठे मन करून सांगतो
“मला खरं प्रेम झाले” ! ते कसे झाले ? केव्हा झाले ? हे अजुन मला कळलेच नाही. मी या प्रेमाच्या धुंदीत स्वतःला तिच्याकडे सोपवलं होतं. तिच्याशी बोलता बोलता नजरेशी नजरा कशा भिडल्या , मनाशी मने केंव्हा बोलली, प्रितीचे सूर केव्हा जुळले कळलेच नाही. ती प्रितीची एक तार केव्हा साखळीपरी बंधनात अडकली समजले नाही. लॉक डाऊन सुरू झाले अन् कॉलेज बंद झाले तेव्हापासून तुझी भेट झाली नाही गं अन् मला तुला जे सांगायचं तेही राहून गेलंय..! तुझी खूप आठवण येतेय, रात्र रात्र झोप लागत नाही, तुझीच स्वप्ने मनाला सतावत असतात. मनात ती रुतत असतात प्रत्येक क्षणी. तुझ्यासारखी आजपर्यंत कुणी दिसली नाही, तुला पाहताच मन ताजेतवाने फुलून यायचे, श्रावणसर आल्यासारखं मनाला वाटायचं.
तू कोमल गुलाबाच्या पाकळीसारखी नाजूक आहेस..!. तुला आठवताच तुझ्या सोबतीचे क्षण डोळ्यासमोर तरळत राहतात. तुझ्याविना मी मलाच useless सारखा वाटतोय.जसा विना सिम कार्डचा मोबाईल.
तुझ्याविना आयुष्यात रितेपणा भासतोय..!. तू केंव्हा येशील ती रिक्त जागा भरायला..? मला सावरायला..? नव्या आशेने प्रितीच्या वळणावर न्यायला, हातात हात पकडून चालायला..?.
ते रुतलेले घाव दिवसेंदिवस वाढत चाललेत. केंव्हा भेटाव तुझ्याशी मनमोकळेपणाने केंव्हा बोलू, केव्हा तरी बोलणं होईल का ? का कधीच नाही ? आपण आता नाही बोललो तर नंतर खूप उशीर होईल का ? असे प्रश्न मनाला आणखी दुःखवतात. तुला मिठीत घेण्याचे स्वप्न. स्वप्नच राहील का ? असे वाटते प्रितीने चिंब भिजल्या काळजाने स्वप्न बघावं.. तुझ्या आठवणीत झुरत राहावं तुझ्यासाठी गीत लिहीत राहावं ,
मला हसवणारी, अनोख्या जगात नेणारी केंव्हा येईल जवळ..? हसून केंव्हा बोलेल ? मी त्या क्षणाची वाट बघत असतो..रात्रंदिवस.
सखे..! माझ्यासारखी तुलाही असेच प्रश्न सूचत असतील का ? स्वप्नामध्ये प्रियकराची गोड आठवण सतावत असेल का ? ..का या पेक्षा वेगळ्या आठवणीत तू रमत असशील..! का तू या सगळ्यापासून खूप लांब आहेस..!. सखे, जसा पाण्याविना मासा तळमळतो तसा मी तुझ्याविन” मी कुठेही असलो तरी असतो तुझाच ध्यास.. मनाची अवस्था अनावर होत जाते. समुद्राशी जशी नदी जाऊन मिळते तशी तू मला जुळली आहेस जणू नदी आणि सागर जणू एकजीव झालेत असं मनाला वाटू लागलंय.. सागराच्या लाटात, नदी मिसळावी तशी तू माझ्या धडकनाशी तू एकजीव होऊन जुळली आहेस. माझे श्वास असेपर्यंत तुझ्या आठवणीत माझ्यापासून दूर जाऊ शकत नाहीत.
माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे हे माझ्या काळजातलं प्रेम मी तुला कसं दाखवू…?. आजपर्यंत कुणीही दाखवलं नाही. ते फक्त जाणवत राहतं.
प्रेमाची felling मनात येते.ती फक्त काळजालाच कळते…वातावरणातल्या अदृश्य ऑक्सिजनप्रमाणे..फक्त “एहसास” म्हणजे फक्त भास. असच प्रेमाचं सुध्दा असतं त्याचं measurements सुध्दा करता येत नाही. ते unlimited असतं
सखे , का ? तू मला नकार देशील की,स्वीकारशील..? ..तुझ्या मनाची प्रतिक्रीया मला कशी कळेल..? तू थोडा विचार करून स्वतःच्या काळजाला विचारून कळंव…कारण..” जी माझ्या स्वप्नातील परी असेल, माझ्यावर हुकूम चालवणारी हुकूमाची राणी असेल.ती तू आहेस..! माझ्या एकेका स्पंदनाशी तू जुळली आहेस, तू माझी धडकन आहेस..! आतापर्यंत जी मी ही रहस्यमय गोष्ट सांगितली आहे ती आहे या शरीराची जान..!!

◼️ ✍️  नितेश  खरोले गोरेगाव, गोंदिया
         मोबाईल : 8329454924.
      kharolenitesh41@gmail.com.

One Reply to “◼️ मर्मबंध लेख : प्रेमपत्र..( काल्पनिक)”

  1. संपादकाचे मनःपूर्वक आभार तसेच समूहाचे सुध्दा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *