◼️ काव्यरंग : थोडा विचार कर रे तू

थोडा विचार कर रे तू

पोटा पाण्याचा साधन
माणसा आणलास रे तू
इकडे तिकडे फेकून
कचरा केलास रे तू….

शाळा कॉलेज शिकून
शहाणा झालास रे तू
बुद्धी गहाण ठेऊन
अंद्धश्रद्धेच्या आहारी गेलास तू…

माणूस माणूस एक असून
जातीभेद केलास रे तू
भावा भावात फूट पाडून
वैऱ्यासारखा वागतोस रे तू…

देव माणसात असून
दगडात शोधलास रे तू
स्वार्थपणाच्या आहारी जाऊन
माणुसकी विसरलास रे तू…

कीर्तनासारखे माध्यम वापरून
समाज प्रबोधन करतोस रे तू
संत गाडगे बाबा थोर पुरुष
त्यांची शिकवण जाण रे तू…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *