◼️ काव्यरंग : कोसळे धबधबा

कोसळे धबधबा

निसर्गाचा अद्भुभूत नजारा
दर्‍या-खोर्‍यातूनी कोसळे छान
शुभ्र धबधबा दुधासारखा
दृश्य पाहून हरपते भान

सृष्टी नटते हिरवळीने
पाण्याचा कोसळे धबधबा
उंच कड्यावरून येती
पाहूनच वाटतो दबदबा

वसुंधरेचे पाहून सौंदर्य
नयन रम्य सजते दृष्टी
कोसळणाऱ्या जलधारा पाहून
भिजून जाते सौंदर्याने सृष्टी

सुंदर ही निसर्ग किमया
पाहून मन होते थक्क
तृप्त होते तन आणि मन
जनलोक होतात चक्क

सहलीस जातात लोक
मुग्ध होतात धबधबा पाहून
नयनरम्य दृश्य लोचनी
साठवतात तेथे जाऊन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *