योग्य स्थळ दाखवणं
हिरवी शाल जळते ,
दिपकाच्या तेजाने,
दगडातून घाम गळतो
जळत्या वातीने.
नुकतंच कुणाच्या रागाने,
क्रोधात आणलंय मनाने,
गगनातस पडल्या भेगा
भरावे दुःखाच्या आसवांने.
विना पावसाचे अंगही भिजले
तुझ्या सोबती चांदणं जळल्याने.
तु जळून कोळसा झालास
अन् आयुष्यास लागलीत ग्रहणे
नको होऊ तू परका
मनांतही डोकावून समजून घे भावनांशी,
वाहणारे माझे निर्झर अश्रूही आटले,
लढणे सोडले आता पापी जीवनाशी.
बघ या निष्पाप डोळ्यात,
ऐक काळजातली करुणा
वाट भटकली तुझी पाखरे
जरा आता तूच सावर ना!
तुझ्याच सरणी आलोय मी
तूच योग्य स्थळ दाखव ना!
भटकेल्या पाखरांना,
माय सारखे थोड जप ना!
🔴नितेश खरोले, 8329454924
गोरेगांव गोंदिया.
रवींद्र महाविद्यालय चोपा
संपादकाचे मनःपूर्वक आभार धन्यवाद सर