“लग्न मनोरंजन नाही संस्कार आहे” या विचारातून घडला आदर्श विवाह !

“लग्न मनोरंजन नाही संस्कार आहे” या विचारातून घडला आदर्श विवाह !

गोंदिया :- मानवीजीवनातला महत्वाचा संस्कार म्हणजे विवाह. आज विवाह सोहळे संस्स्कारापेक्षा देखावे झाले आहे. विवाह सोहळ्यातील इव्हेंट त्यावर लाखोचा खर्च. डीजेचा कर्कश आवाज त्यावर बेधुंद नाचने. सोबत मदीरेचे घोट. जेवनाच्या पंगतीं काळानुरूप थांबल्या. बोफे त्यातील अन्नाची नासोडी. श्रीमंतीच प्रदर्शन, दागदागीने भरजरी कपड्याचा फॅशन शो.पण गरीबांच काय? तो लोक लाजेस्तव कर्जाच्या फासात अडकुन लग्न समारंभ करतो.

आनंद जीवनाचा भाग आहे. पण तो पैशाने विकत मीळत नाही. पैशाने विकत मिळत ते असत मनोरंजन. आनंद हा अनंत काळाचा साथी असतो. मनोरंजन क्षणीक आनंद देत दुःखाला स्वीकारतो.
27 डीसेंबर 2020 ला एक आदर्श विवाह पार पडला.  ते लग्न गोंदिया जील्हा नवेगावबांध जवळ मु. बोळदे ता. अजृनी पो. बाराभाटी येथील नारायणजी साऊस्कार यांच्या कुंदनाताई मुलीचा.
या परीवारातील परीवर्तन विचाराचा तरूण मुलगा, ताराचंद साऊस्कार याला बहीणीचा आदर्श विवाह अनाठायी रूढ्या, रूसवे फुगवे, जे विवाह सोहळ्यात विघ्न ठरतात. ते टाळत समाजा समोर आदर्श ठेवायचा होता. त्याने एक महीण्या अगोदर त्यांचे मीत्र डाॅ. सरोदे यांच्याशी चर्चा करून हा विवाह घडवून आणला. आणि हा विवाह ‘ सत्यशोधक पध्दतीने  ‘ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगीतलेल्या ‘श्रीगुरूदेव सुसंस्कार विवाह पध्दतीने’ पार पडला.
खरच लहानश्या खेड्यात लग्न, वेळेचे महत्व पाळत नवरदेव लग्न मंडपात पोहचले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या “माणूस द्या मज माणूस द्या, ही भीक मागता प्रभु दिसला” “सच काम किया जगमे जीसने, उसने प्रभु नाम लिया न लिया” ग्राम्रीण भागातील माणस आया बहिनी एकदम भारावल्या सारखे शांततेत भाजनात मत्रं मुग्ध झाले. श्रीगुरूदेव अध्यात्म गुरूकुल गुरूकुंज मोझरी येथील युवा आकाश तावीडेचे बोल अंतकरणाला भीडत होते. साथीला अमर तावीडे, श्रीगुरूदेव चळवळीचे नागपूरातील चंद्रभान राऊत, श्रीगुरूदेव अध्यात्म गुरूकुलाचे संचालक रवीदादा मानव होते.
राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्याचे अभ्यासक ज्ञानेश्वरदादा रक्षक विवाह संस्काराचे महत्व उपस्थीतांना राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेच्या विचारातून सांगत होते. “विवाह हा फक्त दोन जीवाचे मीलनच नाही, तर दोन परीवाराचे एकत्रीकरण आहे. विवाह म्हणजे मन जुळने. नाही तर साध्या देण्या घेण्यावरून, अहीराच्या कपड्यावरून वाद निर्मान होतात. दोन परीवारीचे त्यातून शत्रुत्व नीर्माण होते. यातून मुलामुलींच जीवन उध्दवस्थ होते. सोयरीक म्हणजे एकमेकाचे सुख दुःख जाणने. पत्नीला कष्ट पडले तर पतीच्या डोळ्यात अश्रु येणे हे खरे वैवाहीक जीवन. आकाशतले ग्रह पाहन्यापेक्षा आपल्या जीवनात दुराग्रह होऊ नये. ज्यातून कुंटुब विस्कळीत होऊ नये याची काळजी घ्यां.” रोजच्या जीवनातील घटना, उदाहरणाचे दाखले देत ज्ञानेश्वरदादा रक्षकांनी प्रबोधन केले.
हा आदर्श विवाह सोहळा ज्ञानेश्वरदादा रक्षक यांच्या मार्गदर्शनात चंद्रभान राऊत,रवीदादा मानव, विवेक मुते यांच्या सहकार्याने पार पडलां. या आदर्श विवाहाचे सर्वत्र कौतुक होत होते.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *