◼️ काव्यरंग : दिगंतरी

दिगंतरी

पाय टिकत नाही आता
माझा दृश्य जमिनीवरी
झेपावू पाहतयं मन खुळं
विहगासम त्या दिगंतरी

झंझावात अवघा लोटून
निरंकुश विहरत रहावी
होवूनी स्वार लेखणीवर
काव्य दर्पणात मिरवावी

नजर जाईल तिथपर्यंत
वेचून घ्यावीत शब्दफुले
वाऱ्यावरती बांधून झुला
चंद्र, सूर्यही मजसवे डुले

ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान हे
सारेच माझ्या सभोवती
सृजनाची वाट चालतांना
येई हृदयसागरास भरती

‘लोक काय म्हणतील’ या
विचारांची टाकली कात
कर पसरून स्विकारतेय
जे काही घडतंय आत

उडान ही आत्म भेटीची
विसावेल आता दिगंतरी
क्षितिजापल्याड बहरेल
अस्तित्वाची सुंदर नगरी

One Reply to “◼️ काव्यरंग : दिगंतरी”

  1. मीताताई अप्रतिम उत्कृष्ठ प्रेरणादायी महत्त्वाचे म्हणजे तुमचे सर्व काव्य हे साचेबद्ध असते शब्द गुफण लयबद्धता यमक शब्द जादूगारीता या काव्यत दिसून येते राहूल दादा आणि सविताताई यांनी योग्य त्या कवितेला मान दिला परिक्षकांचे आभार मीताताई अभिनंदन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *