◼️ काव्यरंग : दत्त दिगंबर दैवत माझे

दत्त दिगंबर दैवत माझे

दत्ताची सावली
सुखाची आहे छान
श्री दत्त जयंती आज
सोज्वळ मूर्ती महान

श्री दत्तगुरु देवाची
नित दर्शनाने होते वारी
निराकार रूप निर्विकार
अवतार घेतले त्यांनी भारी

दत्त दिगंबर दैवत माझे
अनुसया पोटी जन्मले
त्रिमूर्ती अवतरले भुवरी
दर्शनास लोकं उनमळले

कृपा दत्ताची होई
नित्य चाले नामजप
आशिष देई मज
करी मी नेहमी तप

श्री दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र
पितृ दोष दूर होतात त्यांनी
उन्नतीचे मार्ग सापडे तंत्र

दत्ताचे थोर दर्शन
गाय असे चरणाशी
परमार्थ साधते जीवनी
नित्य दत्तगुरु स्मरणाशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *