◼️ काव्य रंग : मुक्तछंद

#मुक्तछंद..(कविता)

काळोखातून आज स्वप्नांची दुनिया उगवली,
कधी सुचले नाही, ते डोळ्यांनी स्वतः पाहिली,
माझ्या काळजाची हाक,
धडकताना कळली,
माझ्यासमोर आज प्रेयसी,
प्रीत जाहीर करण्यास आली,
एकदम प्रसन्न वातावरण,
नजरेशी नजर मिळवत, जवळ आली,
“तुने माझ्या काळजात मुक्काम केला”
असं हळुवार बोलली,
माझ्या नयनातूनी आनंदाचे अश्रू वाहिले,
तिच्या नयनातून अश्रू अनावर झाले,,
अश्रु एकमेकांचे पुसूनी,
तिला मी मिठीत घेतले..

तिच्या नयनात खऱ्या प्रीतीचे
मला मोती सापडले ,
हे ईश्वराला देखील दिसले,
म्हणून त्यांनी आम्हास मिळवले.
आमची दोन शरीरे पण
एक जान होती..
म्हणून मी होकार दिला..

फुलपाखरे अनेक भिनभिनते
बघताच प्रपोजरच्या फुलाला,
गुलाबाचे रुतणार काटे जरी हाताला,
तरी हातात धरावासा वाटे प्रत्येकाला..
या गुलाबाच्या सुगंधाने ,
मन भरून आले,
दळवळणाऱ्या गंधाने, आयुष्यातील रिक्तपण नाहीसे झाले……….
येताच ती क्षणात
बदलल्या नशिबाच्या रेषा,
स्वप्नांची पहाट झाली,
उजळल्या आनंदाने दाही दिशा.
प्रकृती अशीच स्वप्नांची घडून ये, बघतच राहवं त्या क्षणाला,
हाती रुतले जरी काटे,
तरी हाती रुतुदे हा साजरा,
माझ्यासाठी अन् आणखी एकदा हा नजारा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *