◼️ काव्यरंग : स्वागत नववर्षाचे

स्वागत नववर्षाचे

सरूनी गेलेय हे जुने वर्ष
उरल्यात फक्त आठवणी
करूया स्वागत नववर्षाचे
ठेवु हृदयात या साठवणी

करूया संकल्प नववर्षाचे
धरुनी ध्यास हाच ध्यानी
पूर्ण करू इच्छा आकांक्षा
ठेवूनि संकल्पना या मनी

गतवर्षातील कडू नि गोड
आठवणींना देऊया विराम
नववर्षाचा जल्लोष करू
नकोच फुकाचा हा आराम

घडवूया भविष्य उज्वल
स्वतेजाने तळपून जीवन
सार्थ करून मनुष्य जन्म
प्रेरित होईल नवसंजीवन

आयुष्य क्षणभंगुर असता
नको घालवू नाहक वाया
समाजऋण फेडूनी टाकू
झिजवुनि आपुली काया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *