◼️ काव्यरंग : नववर्षाभिनंदन….!!!

नववर्षाभिनंदन….!!!

२०२१ हे नवीन वर्ष
जुने वर्ष संपून गेले
चांगल्या वाईट आठवणीसह
भूतकाळात मन रमून गेले…
काय हरवले काय सापडले
हिशोब आता लागत नाही
वर्षभराच्या दुःखासमोर
सुख अजिबात जाणवत नाही…
नवीन वर्ष असं असतं
नवीन काही ठरवायचं असतं
नवीन कल्पना मांडून हे जग
आपलंसं करायचं असतं…
मनापासून देवाला प्रार्थना माझी
पूर्ण होवोत सर्वांच्या ईच्छा
नवीन वर्षाच्या तुम्हां सर्वांना
मनापासून हार्दिक शुभेच्छा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *