◼️ काव्यरंग : स्वागत नव वर्षाचे..!!

स्वागत नव वर्षाचे..!!


नव्या वर्षाचे नवे सूर
सरला डिसेंबर छान
नव्या वर्षाचे अंबर
खुणावते त्याला महान

वर्षभर सोबत मिळाली
आली नववर्षाची साथ
स्मृती वर्षभराच्या मनाशी
रंग नवे भरली वाट

नव्या वर्षासाठी
मिळाला नवा स्वर
आळविते मी नेहमी
प्रतीक्षेत राहील वर्षभर

स्वागत नव वर्षाचे करू
आनंदाने उत्साहाने खास
कोरोना महामारी ला हरवू
इच्छाशक्तीचा ठेवू अधिवास

नवे क्षितीज नवी पहाट
गुलाल उधळू नवहर्षाचे
नवी उमंग नवे तरंग
स्वागत करून नववर्षाचे

रोजचा नवा दिवस घेऊन
नवीन मनात काही ठरवूया
पक्का मनाचा निर्धार करून
संकल्प सिद्धी नववर्षात नेऊया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *